परवाच एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली. आपल्या देशात जे परदेशी पर्यटक येतात त्यांच्या समोर कचरा करू नये, त्यांची लुबाडणूक करू नये, त्यांच्या कडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळू नयेत. आणि हि जाहिरात हिंदी चित्रपट सृष्टीतील एक मोठा अभिनेता करत होता. हि जाहिरात जो संदेश देत होती तो नक्कीच चांगला होता, पण एवढा प्राथमिक संदेश आपल्याला द्यावा लागतो, याचच वाईट वाटत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात स्वच्छता राखावी, रस्त्यात कचरा टाकू नये, चुकीच्या पद्धतीने पैसे कमावू नये, खोट वागू/ बोलू नये.... हे सगळ तर आपण आपल्या पालकांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टीमधून ते दुसरी तिसरीतल्या परिसर अभ्यासात शिकलो आहोत... मग आता तीच गोष्ट पटवून का द्यावी लागते. आणि मुळात परदेशी पाहुणे काय म्हणतील? या हि पेक्षा आपला परिसर, देश स्वच्छ असावा, हि जाणीव प्रत्येक व्यक्तीला का नाही?
थोडा पुढे जावून विचार करायचा झाला तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पाळतो, पण त्यामागे कारण वेगळी असतात. उदाहरणच द्यायचं झाल तर "सिग्नल!"... आपण "सगळेच" सिग्नल लागला कि थांबतो .. पण जवळ जवळ ८०% लोक सिग्नल तोडत नाहीत याच कारण "ट्राफिक पोलीस असला तर पकडेल" हि भीती त्याच्या मनात असते. पण मुळातच सिग्नल तोडणं चुकीच आहे, त्यामुळे ट्राफिक जॅम होऊ शकत, आपला अंदाज चुकून अपघात होऊ शकतो, ह्याची जाणीवच त्यांना नसते. खूप अशा चुकीच्या गोष्टी आहेत ज्या आपण करत नाही, पण त्या मागची कारण वेगळी असतात. त्या खरच चुकीच्या आहेत याची जाणीव असतेच असं नाही, तर "पकडले" जाण्याची भीती मनात असते.
आपल्या जाणीवा इतक्या निष्क्रिय झाल्यात कि नक्की काय चुकीच आहे? काय बरोबर आहे? हे आपल्याला माहित असूनसुद्धा तसं वागण्यासाठी आपल्यावर बंधनं घालावी लागतात/ कायदे करावे लागतात, तरच आपण तसे वागतो आणि त्याबद्दल जराही खंत वाटत नाही... हि केवढी मोठी शोकांतिका आहे... थोडा विचार करण्याची पद्धत बदलली आणि चांगल्या गोष्टी करण्याची सवयच लावून घेतली तर चांगले बदल घडवून आणावे लागणार नाहीत, तर ते आपोआपच घडतील. चांगल्या गोष्टी इतरांना शिकवण्याची गरजच भासणार नाही. स्वतापासून सुरुवात केली तर ती वणव्याच्या आगीसारखी पसरत जावून पूर्ण देशाचाच कायापालट करून टाकेल... मला खात्री आहे ...
Awesome
ReplyDeleteनम्र विनंती. तुमच्या मराठी फेसबुकवर या.
ReplyDeleteलई भारी जॉईन करण्यासाठी www.laibhaari.com या लिंकवर क्लिक करा.
धन्यवाद.
खूप छान आहे तुझा ब्लॉग. आवडला.
ReplyDeletei like u r thoughts i will try my future life
ReplyDeleteHello where are you.
ReplyDelete