आपण वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. पण एक थोडा जुना किस्सा सांगते. भारत वि वेस्ट इंडीस सामना चालू होता. माझी मैत्रीण, मैथिली आणि तिची बहीण सगळी कामं आटपून सामना बघायला बसल्या होत्या. भारताने toss जिंकला होता आणि Batting घेतली होती.
सामना रंगात येऊ लागला होता. तेवढ्यात नेहमी प्रमाणेच आईला काही तरी आठवलं आणि तिने मैथूला भाजी आणि मसाला आणायला पाठवलं. तिला हे सवयीच होतं, त्यामुळे नाही म्हणण्यात अर्थ नव्हता. ती भाजीवाल्याकडे गेली तेव्हा तो transister वर सामन्याची Commentary ऐकत बसला होता. भाजी घेऊन पैसे देत असतानाच सचिन तेंडूलकर बाद झाल्याच दोघांच्या कानावर पडलं.
"सचिन अब बुढ्ढा हो गया है. अब तो खेलना छोड़ देना चाहिए. सिर्फ २ रन्स बनाए. अब ज़रा नए लोगो को चानस देना चाहिए" इति भाजीवाला.
आधीच सचिन इतक्या लवकर बाद झाल्यामुळे मैथु थोडी नाराज झाली होती. आणि त्यात भाजीवाल्याचे शब्द कानावर पडल्यावर त्याला खाऊ का गिळू असं झालं होतं. तिने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला, तसा तो शांत झाला. त्याला शांत केल्याचा एक बारकासा आनंद तिला झाला होता.
जरा चिडचिड करतच मैथु घरी आली, पण कुणीच त्याकडे लक्ष दिले नाही, कारण सामना सुरु असताना मध्येच जावं लागल्याचा तो राग आहे असं सगळ्यांना वाटलं. मैथुही नंतर सामना बघायला बसली खरी, पण घडला प्रसंग काही केल्या डोक्यातून जाई ना. राग तेंडूलकर बाद झाल्याचा नव्हता तर जो माणूस त्याच पूर्ण आयुष्य क्रिकेट जगला, फक्त भारतातच नव्हे तर जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानला जात, क्रिकेटचे सगळे रेकॉर्ड्स ज्याच्या नावावर आहेत, त्या महात्म्याबद्दल एक दीड दमडीचा भाजीवाला असं बोलूच कसं शकतो याचं तिला वाईट वाटत होत. आपण आज चांगले खेळू शकलो नाही याची खंत त्याला स्वतःला नसेल का? एका सामन्यावरून त्याच्यावर लगेच संशय घेण्याच कारण नाही. सचिन लवकर बाद झाल्यावर वाईट वाटण साहजिकच आहे, पण ते व्यक्त करताना आपण भान ठेवलंच पाहिजे. बसल्या जागी दुसऱ्यावर comment करणं सोपं असतं, पण ते करण्याआधी आपल्याला त्यातलं किती आणि काय कळत याचा विचार नको का करायला?
या विचारात हरवून गेलेली मैथु भानावर आली तो पर्यंत भारत सामना जिंकला होता. मैथु ठरवून भाजीवाल्याकडे गेली. आता मात्र त्याचा Transister बंद होता आणि तो कामात व्यग्र झाला होता. मैथुने मुद्दाम खोचकपणे त्याला जाऊन सांगितलं " भैया, भारत जिंकला बरं का!!". त्यावर त्याने मान खाली घालूनच उत्तर दिले "चला अच्छा हुआ".... आता मात्र मैथुला त्याची कीव आली...
- मानसी कुलकर्णी
!!टीम इंडियास अंतिम सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!
chan mast mast mast
ReplyDeletejyala uddeshun tu ha kataksh kela ithe tyala pochla ka?
ReplyDeletecoin casino no deposit bonus codes & codes
ReplyDeleteWelcome bonus 인카지노 code: $1000 welcome bonus · Free Spins bonus · No 메리트 카지노 주소 Deposit bonus · Free Casino Bonus · No Deposit Bonus · worrione Exclusive Casino bonus · Top rated no deposit casinos