बी. कॉम झाले आणि पुढे काय करायचं याचा विचार सुरु झाला. अभ्यासात फर्स्ट क्लास कधीच सोडला नव्हता, त्यामुळे पुढे शिक्षण सुरु ठेवायचं की गेली पाच वर्ष जे नाटकाचे धडे गिरवत होते ते चालू ठेवायचं, हे ठरवायचं होत. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, त्यामुळे नोकरी करण्याचा हि विचार केला होताच... पण आई, ताई च भक्कम माझ्या पाठीशी उभं राहाण, विश्वास सरांनी ठेवलेला पाठीवरचा हात आणि जवळच्या मित्र- मैत्रिणीनी, नातेवाइकानी वाढवलेला आत्मविश्वास अभिनय क्षेत्रात करीयर करण्याचा निर्णय घेण्यासाठी पुरेसा होता.
त्या नंतर जोमाने कामाला लागले, विश्वास सरांच्या हाताखाली पाच वर्ष काम केल्यामुळे पुढे या क्षेत्रात पुढे जाण्याची भीती नव्हतीच. मग भेटी गाठी सुरु झाल्या, audition ना जाऊ लागले आणि कामं मिळण्यास सुरुवात झाली.. दिग्गजांच मदत/ मार्गदर्शन मिळत होतच. या क्षेत्रातील Do's आणि Don't कळायला लागले होते... आणि आता कुठे करियरला सुरुवात झाली आहे, भरपूर काम करायचंय , उत्तमोत्तम भूमिका साकारायच्या आहेत, खूप खूप शिकायचं आहे. असो...
हा ब्लॉग लिहायला सुरुवात करण्याची भूमिका थोडक्यात स्पष्ट करते..
कामानिमित्त हल्ली खूप ठिकाणी फिरणं होत, वेगवेगळ्या माणसांशी भेटी गाठी होतात, आजूबाजूला वेगवेगळे प्रसंग पहायला/ ऐकायला मिळतात. कधी योग्य तर कधी अयोग्य पद्धतीने ते घडलेले असतात. कधी मनाला पटतात तर कधी चुकीचे वाटतात, काही प्रसंग खूपच अस्वस्थ करतात, तर या घडलेल्या प्रसंगावर माझं मत मांडण्यासाठी मी लिहायचं ठरवलंय. यात लिहिलेले प्रसंग कधी स्पष्टपणे, तर कधी काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन मांडलेले असतील.
यात मांडलेले विचार/ प्रसंग प्रत्येक वाचकास पटतीलच असे नाही... असा आग्रहही नाही.... पण माझा एक प्रयत्न मात्र असेल आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर माझे मत मांडण्याचा....!!
- मानसी कुलकर्णी
- मानसी कुलकर्णी